आर्टिकल

 दिनांक ६ जुलै 2024 ला इंटरनॅशनल एक्सलन्स ने मला ‘आऊटस्टॅंडिंग  कॉन्ट्रीब्युशन टू अॅस्ट्राॅलॉजिकल लिटरेचर ‘ह्या कॅटेगरीने सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

     समर्पक सन्मान खूप काही सांगून जातो. तसं पाहिलं तर या कॅटेगरीमध्येच खूप अनोखे सत्य व नावीन्य दडलेले आहे. त्याचा थोडक्यात आढावा उपयुक्त व उद्बोधक ठरेल .

   मुळात माझे संशोधन भारतीय अंकशास्त्रावर आधारित आहे. ज्यातील काही अंक समूहांना एक गुढतेचे  वलय आहे. पाश्चात्य अंकशास्त्रज्ञ किरोला देखील हा गुढ अंक समूह म्हणजे काय प्रकार याचे आकलन झाले नाही. त्याने नवग्रह यंत्रांचे आकलन करण्यात असमर्थता दर्शविली .

जेव्हा रवी म्हणजे 15 चंद्र म्हणजे 18 बुध म्हणजे 24 व मंगळ म्हणजे 21 अशी चार यंत्रे माझ्या अभ्यासात आली, तेव्हा लक्षात आले की ही नवग्रह यंत्रांमधील चार यंत्रे म्हणजे चार मूळ प्रकृतीची द्योतक आहेत.

रवी म्हणजेच स्थूल अग्नी तत्व. चंद्र म्हणजे शीत म्हणजेच जलतत्त्व. बुध म्हणजे पृथ्वी तत्व, अन् मंगळ म्हणजेच सूक्ष्म अग्नी तत्व .

    इथं फक्त स्थूल अंगानेच विचार करावा जो मी फक्त यंत्र पद्धतीच्या माध्यमातून केला. तसं पाहिलं तर बुध प्रुथ्वी तत्वाशी जोडलेला आहे .चंद्र व शुक्र जलतत्त्वाशी, व रवी मंगळ अग्नी तत्वाशी, अन् शनी  वायुतत्वांतर्गत जोडलेला असतो. आणि गुरुचा संबंध आकाश तत्वाशी निगडित. सात ग्रह पंचतत्वांमध्ये समाविष्ट

    माझे त्रिदोष पद्धतीवरील पुस्तक नवग्रह यंत्रे व बाराक्षार चिकित्सा पद्धती हे आय.आय.पी. ने नुकतेच प्रकाशित केले. त्यात आयुर्वेदातील वात ,पित्त कफ या त्रिदोषांचा विचार करून त्रिदोष ग्रहांच्या माध्यमातून विश्लेषित केले आहेत. अर्थात त्यांचा संबंधही बारा क्षार औषधांशी सुरेख पद्धतीने साधण्यात आला आहे.

    ह्याच पद्धतीच्या दुसऱ्या भागाचे लेखन चालू आहे. त्यात एखाद्या पेशंटची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव अशा माहितीच्या आधारे बाराक्षारांची नवीन उपचार पद्धती विकसित केली आहे. ज्यांचा संबंध नवग्रह यंत्रांची जोडला आहे.

नवग्रह यंत्रे म्हणजे त्या त्या रुग्णाची शरीरातील संतुलित स्थिती. वात, पित्त व कफ

   या पद्धतीने उपचारही आशादायक आहेत. त्यांना कोणते दुष्परिणाम नाहीत. आणि काही व्याधी नसतानाही तुम्ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी कमीत कमी औषधांचे एक कॉम्बिनेशनही वापरू शकता.

    बाराक्षार उपचार पद्धती भारतात दुर्लक्षित आहे. ऍलोपॅथीच्या गराड्यात ती दबून गेली आहे. ह्या माध्यमातून तिला ऊर्जितावस्था व नवचैतन्य मिळावे ह्यासाठी माझे परिश्रम भविष्यात चालूच राहतील .हे ज्ञान ‘नवग्रह यंत्रे व बाराक्षार उपचार पद्धती, ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात देण्याचा, माझे विचार व लेखन चालू आहे.

    प्रत्येक नक्षत्र कोणत्या अवयवांनी व आजारांनी युक्त आहे याची चिकित्सा पेशंटच्या जन्मतारखेवरून केली जाते. अंशात्मक कुंडलीचा विचार करून नक्षत्रांवरील दृष्टी योगही विचारात घेतले जातात.

ह्यामधून ऋणाची प्रकृतीही काढावी लागते .एकतत्वीय प्रकृती बरीच कमी आढळते. त्यानंतर ग्रहांचे गुणधर्म एकत्रित करून एक एकत्रित औषधी  समीकरण काढावे लागते. आणि ते हर्षल ,नेपच्यून, प्लुटोने संतुलित करावे लागते. इथेच रुग्णाचे औषधी समीकरण तयार होते.

   खंत इतकीच आहे की, प्रथम सर्व उपचारपॅथी हाताळून ऋण सरते शेवटी जेव्हा ह्या उपचारपद्धतीसाठी येतो तेव्हा त्याच्या व्याधीची चौथी स्टेज सुरू झालेली असते. जिथे यशाचे शिखर गाठणे म्हणजे एक अवघड काम होऊन बसते.

   काही असले तरी एकात्तराव्या वर्षीही उमेद कायम आहे. सर्वांचे हातभार लागल्यास ह्या अनोख्या उपचार पद्धतीचे यशाचे शिखर खूप लांब नाही. शिकविण्याचीही इच्छा आहे. फक्त तळमळीने व चिकाटीने शिकणारे जिज्ञासु हवेत. लेख वाचून काही जरी संपर्कात आले तरी लेखाचे सार्थक झाले असे समजेन .

यशवंत दत्तात्रय घैसास .

मंडणगड.

 जिल्हा- रत्नागिरी.

 महाराष्ट्र 415 203

 मोबाईल 88 05 28 33 91

*************************